Maharashtra Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. विशेषतः कोकण रेल्वे मार्गावर जें प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी ही एक गुड न्युज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसला कोकण रेल्वे मार्गावरील एका महत्त्वाच्या स्थानकावर नवीन थांबा देण्यात आला आहे.
या एक्सप्रेसला कोकण रेल्वे मार्गावरील पनवेल या अति महत्त्वाच्या स्थानकावर नवीन थांबा मिळाला आहे. यामुळे पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा लाभ उचलता येणार आहे. या परिसरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास या निमित्ताने गतिमान होण्यास मदत मिळणार असा दावा केला जात आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ही एक्सप्रेस ट्रेन सध्या रत्नागिरी, मडगाव, कोझिकोडे मेन आणि मंगुळुरु या चार स्थानकावर थांबत आहे. ही ट्रेन राजधानी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटली की थेट रत्नागिरीला थांबते.
यामुळे रत्नागिरीला जाणाऱ्यांना निश्चितच या गाडीचा फायदा होतो मात्र त्यापूर्वी पनवेलला देखील या गाडीला थांबा मिळाला तर पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांना देखील या गाडीचा फायदा उचलता येणार असे सांगितले जात होते. यामुळे पनवेलला ही गाडी थांबली पाहिजे यासाठी रेल्वे प्रवाशांनी मोठी मागणी केली होती.
रेल्वे प्रवाशांची ही मागणी रेल्वे बोर्डाने गांभीर्याने घेतली आणि आता ही गाडी पनवेल या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. हा निर्णय उद्यापासून अर्थातच 26 ऑगस्ट 2023 पासून लागू होणार आहे. 26 ऑगस्ट पासून लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसला पनवेल या कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मिळणार आहे.
कसं असेल वेळापत्रक
ही गाडी आठवड्यातून दोनदा धावते. आता ही गाडी पनवेल स्थानकावर थांबणार असून ही गाडी पनवेल स्थानकावर केव्हा येणार याबाबत रेल्वेने माहिती दिली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी रात्री 20:50 वाजता रवाना होणार आहे आणि पनवेल स्थानकावर रात्री 21: 44 वाजता पोहचेल.
पनवेल स्थानकावर केवळ दोन मिनिटांचा थांबा या गाडीला राहणार आहे. मग रात्री दोन पंचवीस ला ही गाडी रत्नागिरी स्थानकावर पाच मिनिटांचा थांबा घेणार आहे. यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे. परतीचा प्रवासाबाबत बोलायचं झालं तर एर्नाकुलम स्थानकावरून ही गाडी रात्री 21:45 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
ही गाडी परतीच्या प्रवासात पनवेल स्थानकावर संध्याकाळी 17:02 वाजता पोहचणार आहे आणि रत्नागिरी स्थानकावर 15:30 वाजता पोहोचणार आहे. पनवेलला दोन मिनिटांचा आणि रत्नागिरीला पाच मिनिटांचा थांबा या गाडीला राहणार आहे.