Maharashtra Railway : भारतात रेल्वे हे प्रवासाचे सर्वात मोठे साधन आहे. एका शहरावरून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी रेल्वेला पसंती दाखवली जाते. जर समजा परराज्यात प्रवास करायचा असेल तर मग रेल्वे हा सर्वात बेस्ट ऑप्शन ठरतो.
त्याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास खूपच स्वस्तात पूर्ण होतो, रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील कोणत्याही भागात जायचे असेल तरीदेखील रेल्वेने जाता येते. पण, सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी वाढत असते.
यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी अनेक लोकांना प्रवासासाठी कन्फर्म तिकीट मिळत नाही. रेल्वे गाड्या मध्ये जागा मिळत नसल्याने प्रवासासाठी इतर पर्यायांचा विचार करावा लागतो.
खाजगी ट्रॅव्हल्स, बस किंवा इतर खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. यामुळे मात्र प्रवाशांच्या खिशाला कात्री बसते. दरवर्षी दिवाळीच्या काळात देखील रेल्वे गाड्यांमध्ये अशीच तुफान गर्दी पाहायला मिळते.
त्यामुळे या गर्दीच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीच्या काळात मध्य रेल्वेच्या माध्यमातून विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचे नियोजन आखण्यात आले. या विशेष एक्सप्रेस गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
आता मध्य रेल्वेने या विशेष गाड्यासंदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला असून या विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामुळे जे प्रवासी दिवाळीसाठी गावाकडे गेले असतील त्यांना पुन्हा एकदा आपल्या कर्मभूमीकडे परतताना या गाड्यांचा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सिवान रेल्वे स्थानकावर धावणारी साप्ताहिक स्पेशल गाडी ३ डिसेंबर २०२३ पर्यंत चालविण्यात येणार आहे.
छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष 1 डिसेंबर 2023 पर्यंत चालवली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर साप्ताहिक स्पेशल ९ डिसेंबर २०२३ पर्यंत चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दानापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष १० डिसेंबर २०२३ पर्यंत चालवली जाईल असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
पुणे – दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष १४ डिसेंबरपर्यंत रुळावर धावणार असल्याचे सेंट्रल रेल्वेकडून सांगितले गेले होते.
दानापूर पुणे द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 15 डिसेंबर पर्यंत चालवण्याचा निर्णय झाला आहे.