Maharashtra Railway : रेल्वे हे राज्यासह संपूर्ण देशात प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. भारतीय रेल्वेला स्वातंत्र्य पूर्वीचा इतिहास आहे. आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेच्या प्रवासाला विशेष प्राधान्य दाखवले जाते.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवासासाठी खिशाला परवडणार आहे आणि दुसरे कारण म्हणजे रेल्वेने देशातील कोणत्याही कोपऱ्यात सहजतेने पोहोचता येते. दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
ती म्हणजे ऐन विकेंडला राज्यातील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे वीकेंडला मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. खरंतर या दोन शहरा दरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र वीकेंडच्या काळात ही संख्या आणखी वाढते.
दरम्यान या वीकेंडला या दोन्ही शहरादरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कारण की या मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
काबर रद्द होणार गाड्या
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे विभागाकडून खडकी ते शिवाजीनगर या दरम्यान 25 आणि 26 तारखेला ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी आणि रविवारी घेण्यात आलेल्या या विशेष ब्लॉकमुळे या मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द होणार आहे.
तसेच पुणे ते लोणावळा दरम्यानच्या 46 लोकलच्या फेऱ्या देखील रद्द केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता आपण या ब्लॉकमुळे कोणकोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील याबाबत जाणून घेणार आहोत.
या एक्सप्रेस गाड्या होणार रद्द !
हाती आलेल्या माहितीनुसार, या विशेष ब्लॉकमुळे शनिवारी अर्थातच 25 नोव्हेंबर रोजी मुंबईवरुन पुण्याला येणारी सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या दोन गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.
तसेच रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवरुन पुण्याकडे येणारी इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय, पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, कोयना एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
यामुळे मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे दोन दिवस विशेष अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान विकेंडला या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रद्द झालेल्या गाड्यांनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.