Maharashtra Railway : दिवाळीचा सण आटोपला आहे. राज्यासह संपूर्ण देशात नुकताच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. दिवाळीच्या कालावधीत मात्र राज्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवाळी काळात मोठी तारेवरची कसरत करावी लागली होती.
तथापि रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी काळात विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील बहुतांशी लोकांचा दिवाळीच्या काळातला गावाकडचा प्रवास सोयीचा झाला होता. आता दिवाळीचा सण आटोपला आहे यामुळे रेल्वे गाड्यांमधील गर्दी कमी होईल असा अंदाज होता.
मात्र अजूनही गावाकडून मोठ्या प्रमाणात नागरिक कामासाठी रेल्वेने प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यावरून गावाकडे गेलेले नागरिक आता गावावरून पुन्हा एकदा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये परतीचा प्रवास करत असल्याचे चित्र आहे. यामुळे अजूनही रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी आहे.
दरम्यान या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुंबई पुणे नागपूर अमरावतीसह विविध भागातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की मध्य रेल्वेने महाराष्ट्रातून धावणाऱ्या चार विशेष एक्सप्रेस गाड्यांना मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
दिवाळीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या चार विशेष एक्सप्रेस गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा होणार असून दिवाळीच्या काळात गावाकडे गेलेल्या पब्लिकसाठी हा निर्णय दिलासादायी ठरणार आहे.
कोणत्या गाड्यांना मिळाली मुदतवाढ ?
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या सीएसएमटी नागपुर विशेष गाडी क्र. ०२१३९ ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाडीच्या 11 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. म्हणजे ही गाडी आता २८ डिसेंबरपर्यंत धावणार असे सांगितले जात आहे.
तसेच नागपूर ते सीएसएमटी दरम्यान सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक ०२१४० या विशेष सुपरफास्ट गाडीला सुद्धा मुदत वाढ देण्यात आली आहे. या गाडीच्या देखील 11 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहे. ही ट्रेन ३० डिसेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे.
याशिवाय सेंट्रल रेल्वेने नागपूर – पुणे या मार्गावर दिवाळीच्या काळात सुरू केलेली गाडी क्र. ०२१४४ ही विशेष एसी गाडीला सुद्धा मुदतवाढ दिली आहे. आता ही गाडी 28 डिसेंबर पर्यंत धावणार आहे. तसेच पुणे – नागपूर दरम्यान दिवाळीच्या काळात सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक ०२१४३ ही विशेष एसी गाडीलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही ट्रेन २९ डिसेंबरपर्यंत चालवली जाणार अशी माहिती मध्ये रेल्वेने दिली आहे.
याशिवाय गाडी क्र. ०११२७ ही लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते बल्हारशाह दरम्यान दिवाळीच्या काळात सुरू करण्यात आलेली विशेष ट्रेनलाही रेल्वे विभागाने मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ही गाडी 26 डिसेंबर पर्यंत धावणार आहे.
तसेच गाडी क्रमांक ०११२८ ही बल्हारशाह ते राजधानी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवण्यात आलेल्या विशेष गाडीला देखील मुदतवाढ मिळाली आहे. ही दिवाळीच्या काळात सुरू झालेली गाडी आता 27 डिसेंबर पर्यंत धावणार आहे.