Maharashtra Railway News : देशभरातील रेल्वे प्रवाशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेसची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. या गाडीचा बोलबाला एवढा वाढला आहे की ही गाडी वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी केली जात आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देखील या संदर्भात नागरिकांकडून मागणी केली जात आहे. एकंदरीत या गाडीची लोकप्रियता कमी दिवसात खूपच वाढली आहे. ही गाडी जवळपास 180 किलोमीटर प्रति तास या कमाल वेगाने धावण्यास सक्षम आहे. निश्चितच या गाडीचा वेगच या गाडीची विशेषता आहे.
मात्र रेल्वे बोर्डाने या गाडीला देशात 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास परवानगी दिली आहे. ही गाडी केवळ वेगवान प्रवासासाठी ओळखले जाते असं नाही तर या गाडीमध्ये असणाऱ्या टॉप क्लास सुविधा, या गाडीमधला आरामदायी प्रवास देखील या गाडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी कारणीभूत आहे.
दरम्यान रेल्वे प्रवाशांमधील ही लोकप्रियता पाहता आता केंद्र शासनाने 2024 च्या अखेरपर्यंत देशातील एकूण 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू झाली असून येत्या काही महिन्यात देशातील महत्त्वाच्या 10 मार्गावर ही गाडी सुरू होणार असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या 10 पैकी दोन मार्ग महाराष्ट्रातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या पुणे शहराला आणि उपराजधानीचा दर्जा प्राप्त असलेल्या नागपूर शहराला वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे.
पुणे ते सिकंदराबाद आणि नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
जनशताब्दी बंद होणार
सध्या पुणे ते सिकंदराबाद दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेस सुरू आहे. ही गाडी आठ तास आणि 25 मिनिटात पुणे ते सिकंदराबाद हा प्रवास करते. पण या मार्गावरील प्रवास जलद व्हावा यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस बंद करून वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.
याव्यतिरिक्त नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. सध्या या दोन शहरा दरम्यान सात तासात प्रवास केला जातो मात्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.
नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत केव्हा सुरु होणार?
याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. मात्र येत्या काही महिन्यात दहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यात नागपूर ते सिकंदराबादच्या गाडीचा पण समावेश आहे. ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टोक्ती आलेली नाही पण या गाडीला काजीपेट, रामागुंडम, मनचेरियल, सिरपूर कागजनगर आणि बलारशाह या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे.