Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासाचा एक अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची सर्वात बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी महाराष्ट्रातून आणखी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना गर्दीच्या कालावधीत दिलासा मिळणार आहे. उन्हाळी गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सोयीचा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वास्को-द-गामा ते मुजफ्फरपुर यादरम्यान उन्हाळी हंगामात होत असलेल्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष उन्हाळी गाडी चालवण्याचा निर्णय झालेला आहे. ही गाडी कोकण, उत्तर महाराष्ट्र येथील रेल्वे प्रवाशांसाठी फायद्याची ठरणार आहे.
ही गाडी कोकणातून आणि उत्तर महाराष्ट्रातून धावणार असल्याने या विभागातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
हाती आलेल्या माहितीनुसार, वास्को द गामा- मुझफ्फरपूर जं. उन्हाळी विशेष साप्ताहिक गाडी (गाडी क्र. 07309) 17 एप्रिल ते 8 में या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी वास्को द गामा येथून प्रत्येक बुधवारी वास्को द गामा रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 16:00 वाजता सोडली जाणार आहे.
तसेच ही गाडी मुजफ्फरपुर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता पोहोचणार आहे. तसेच गाडी क्र. 07310 ही उन्हाळी विशेष गाडी 20 एप्रिल ते 11 मे या कालावधीत चालवली जाणार आहे.
ही गाडी या कालावधीत मुझफ्फरपूर जंक्शन येथून प्रत्येक शनिवारी दुपारी 13:00 वाजता सोडली जाणार आहे. तसेच ही गाडी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी साडे सहा वाजता वास्को द गामा रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही उन्हाळी विशेष गाडी कोकणातील आणि उत्तर महाराष्ट्रातील सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील या रेल्वेस्थानकांसमवेतच ही गाडी 23 महत्वाच्या स्थानकावर थांबणार आहे.