Maharashtra Railway News : रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मिरज ते जयनगर दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे. ही एक साप्ताहिक ट्रेन राहणार असून ही गाडी मध्य महाराष्ट्रातून धावणार आहे. पुणेसहित मध्य महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर या विशेष गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.
प्रयागराज येथे महा कुंभ आयोजित होणार असून याचसाठी रेल्वे प्रशासनाने ही विशेष गाडी सुरू केली आहे. हिंदू सनातन धर्मातील अतिशय महत्वाचा अन पवित्र असा महाकुंभ सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक भाविक हजेरी लावणार आहेत.
पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील. त्यामुळे या मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढणार आहे. दरम्यान हीच संभाव्य अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मिरज ते जयनगर रेल्वे प्रयागराजमार्गे सुरू करण्यात आली आहे.
त्यामुळे पुणे z कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतून श्रीक्षेत्र प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी जाणार्या प्रवाशांची सोय होणार आहे. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी या मार्गावरील कोणत्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मिरज ते जयनगर विशेष रेल्वे प्रत्येक शुक्रवारी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी मिरजेतून सुटेल. दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी ती पुण्यात पोहोचेल. रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी प्रयागराज चौकी येथे पोहोचेल, तर दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी ही विशेष रेल्वे जयनगर येथे पोहोचणार आहे.
तसेच, परतीच्या प्रवासात ही साप्ताहिक विशेष रेल्वे जयनगर येथून प्रत्येक मंगळवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. ही रेल्वे दुसर्या दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी प्रयागराज चौकी येथे येईल, तर मिरज येथे रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष ट्रेन?
या विशेष रेल्वे गाडीला मध्य महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर आहे. ही गाडी पुणे, मनमाड, प्रयागराज चौकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पटना, मोकामा, बरोणी, समस्तीपूर, दरभंगा या स्थानकांवर थांबा घेणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे. यामुळे या गाडीचा मध्य महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी आशा व्यक्त होत आहे.