Maharashtra Railway News : मोदी सरकारने आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत. या प्रयत्नांमुळे देशातील दळणवळण व्यवस्था ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. खरे तर, कोणत्याही देशाच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते.
यामुळे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळात अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची, उड्डाणपुलाची, भुयारी मार्ग, रेल्वे स्टेशन, रेल्वे मार्ग तसेच विमानतळांची उभारणी केली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात महाराष्ट्राला आणखी एका नवीन रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे.
सध्या या मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही वर्षांनी हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वर्धा ते नांदेड दरम्यान सुरू असणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम 2027 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. हा रेल्वे मार्ग यवतमाळ मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे.
या रेल्वे मार्गामुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने विदर्भात आणि विदर्भातील जनतेला जलद गतीने मराठवाड्यात पोहोचता येणार आहे. हा रेल्वे मार्ग जेव्हा सुरू होईल तेव्हा वर्धा ते नांदेड हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
यामुळे वर्धा सहित आजूबाजूच्या जिल्ह्यातील आणि नांदेड सहित मराठवाड्यातील अन्य प्रमुख जिल्ह्यांमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र या रेल्वे मार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान आता याचा संदर्भात मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक रामकरण यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत वर्धा- यवतमाळ- नांदेड या रेल्वे लाईन संदर्भात बराच वेळ चर्चा झाली.
या बैठकीत संबंधित अधिकार्यांनी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम संपुष्टात आले असून, रेल्वे मार्गाचे माती करण व अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. सध्या वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वे मार्ग पुर्णत्वास आला आहे अशी माहिती देण्यात आली आहे.