Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. विशेषता पुणे, सांगली आणि सातारा मधील रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी मोठी फायद्याची राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांसमवेतच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मिरज ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला चार नवीन थांबे देण्यात आले आहेत.
खरंतर मिरज ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या या एक्सप्रेस ट्रेनने हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या ट्रेनने पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात.
मात्र या गाडीला आतापर्यंत पुणे, लोणावळा, कल्याण आणि वसई रोड या रेल्वेस्थानकावरच थांबा देण्यात आला होता. यामुळे या गाडीला या मार्गावरील काही अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर देखील थांबा दिला पाहिजे अशी मागणी प्रवाशांची होती.
यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान आता या पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे प्रशासनाने या गाडीला सांगली, सातारा, कराड आणि जेजुरी या चार नवीन रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. याची अंमलबजावणी 18 ऑगस्ट 2023 पासून रेल्वे प्रशासनाकडून केली जात असून या निर्णयामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.
केव्हा धावते ही गाडी
मिरज ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही एक साप्ताहिक गाडी आहे. ही गाडी दर शुक्रवारी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून मिरजच्या दिशेने रवाना होते आणि रविवारी मिरजला पोहोचते. तसेच मिरज स्थानकावरून दर रविवारी ही गाडी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाकडे रवाना होते.
अतिरिक्त थांब्यावर गाडी किती मिनिटांसाठी थांबणार
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा, सांगली आणि कराड या तीन नव्याने जाहीर करण्यात आलेल्या थांब्यांवर ही गाडी तीन मिनिटांसाठी थांबणार आहे. मात्र जेजुरी रेल्वे स्थानकावर ही गाडी फक्त दोन मिनिटांसाठी थांबणार आहे.