Maharashtra Railway News : महाराष्ट्रासह देशातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर कोरोना महामारीच्या काळात विविध रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला होता. यामध्ये मुंबईहून सुटणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांचा काही महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरील थांबा देखील रद्द झाला होता.
देवळाली हे देखील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर जवळपास 24 रेल्वे गाड्यांचा कोरोना काळापासून थांबा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान आता यापैकी दोन रेल्वे गाड्यांना देवळाली रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते पटना आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमृतसर या दोन गाड्यांना आता देवळाली रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! पुण्याच्या युवा शेतकऱ्यांनी सफरचंद शेती यशस्वी करून दाखवली, कोणत्या जातीच्या रोपांची केली लागवड, पहा….
सहा मे 2023 पासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाले आहे. यामुळे देवळाली परिसरातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येथील रेल्वे प्रवाशांना आता मुंबईकडील प्रवास सोयीचा होणार असून पटना तसेच अमृतसर कडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील यामुळे दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दाखवला तर प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आलेला थांबा पुढे कंटिन्यू केला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की देवळाली व परिसरातील रेल्वे प्रवाशांनी या रेल्वे स्थानकावर असलेले थांबे पूर्ववत करण्याची मागणी केली होती. यासाठी प्रवाशांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
आता या पाठपुराव्याला यश आले असून लोकमान्य टिळक टर्मिनस ते पटाना आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमृतसर यादरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या आता देवळाली रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत.
वास्तविक देवळालीमध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी, आर्टिलरी सेंटर, एअरफोर्स स्टेशन या महत्त्वाच्या संस्था आहेत. यामुळे देवळाली मध्ये विविध संरक्षण अधिकाऱ्यांची कायमच वर्दळ असते.
शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर हे देखील देवळाली पासून जवळच असून भगूरला जाण्यासाठी देवळाली स्थानकावर प्रवाशांना उतरावे लागते. अशा परिस्थितीत या दोन गाड्यांना देण्यात आलेला थांबा या प्रवाशांसाठी सोयीचा राहणार आहे.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! युवा शेतकऱ्याने एका एकरात शिमला मिरचीची लागवड केली, 6 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा