Maharashtra Railway News : येत्या चार दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात दिवाळीचा मोठा पर्व सुरू होणार आहे. या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने देखील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरतर दिवाळीच्या सणाला सर्वच रेल्वे मार्गांवर मोठी गर्दी पाहायला मिळते.
पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे रेल्वे मार्गावर देखील दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दरम्यान या मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेता पुणे आणि नागपूरकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला असून हा निर्णय पुण्यात वास्तव्यास असलेल्या नागपूरमधील आणि सर्व विदर्भातील नागरिकांसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
मध्य रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, दिवाळी सणाच्या काळात पुणे ते नागपूर दरम्यान एकेरी सुपरफास्ट ट्रेन चालवली जाणार आहे. ही एकेरी सुपरफास्ट ट्रेन आज पासून अर्थातच पाच नोव्हेंबर 2023 पासून रुळावर धावणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ही एकेरी सुपरफास्ट ट्रेन कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याविषयी देखील आज आपण जाणून घेणार आहोत.
कसं राहणार पुणे ते नागपूर सुपरफास्ट ट्रेनच वेळापत्रक ?
वास्तविक, दरवर्षी दिवाळीच्या सणाला पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्यांची संख्या खूप वाढते. यावर्षी देखील पुण्याहून दिवाळी साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक नागपूरला जाणार आहेत. विदर्भातील बहुतांशी नागरिक पुण्यातच स्थायिक असतात.
त्यामुळे सणासुदीच्या काळात हे नागरिक रेल्वेने प्रवास करून आपल्या गावाकडे परतत असतात. दरम्यान, याच नागरिकांसाठी मध्य रेल्वेने पुणे ते नागपूर दरम्यान 02107 क्रमांकाची एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी आज रविवार 5 नोव्हेंबर पासून चालवली जाणार आहे.ही गाडी रविवारी दुपारी चार वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने रवाना होईल आणि सोमवारी सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी ही गाडी नागपुर येथील रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ?
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते नागपूर दरम्यान चालवली जाणारी ही एकेरी सुपरफास्ट ट्रेन या मार्गावरील उरुळी, दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावल, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या कालावधीत घेण्यात आलेला हा निर्णय निश्चितच रेल्वे प्रवाशांसाठी लाभप्रद ठरणार आहे.