Maharashtra Railway News : दरवर्षी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गणेशोत्सवाचा पर्व मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळते. गणेशोत्सवाचे दहा दिवस सर्वत्र आनंदाचे वातावरण राहते.
हा सण गणेशभक्त मोठ्या उत्साहात साजरे करतात. खरंतर हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो मात्र कोकणात या सणाची बातच काही और असते. कोकणामध्ये दरवर्षी थाटामाटात लाडक्या बाप्पाचे आगमन होते. या सणासाठी संपूर्ण राज्यभरात स्थायिक झालेले कोकणवासी आपल्या गावाकडे निघतात.
अशा परिस्थितीत कोकणवासीयांच्या प्रवासासाठी दरवर्षी भारतीय रेल्वे कडून विशेष ट्रेन सुरू केल्या जातात. यावर्षीही भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या मार्गावर काही विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये मुंबईहून कोकणात मोठ्या प्रमाणात गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त राज्यातील इतरही महत्त्वाच्या मार्गावर गणेशोत्सवाच्या काळात ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
यंदा 19 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या आनंददायी पर्वाच्या अनुषंगाने कोकण रेल्वे कडून पनवेल ते चिपळूण दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे.
लोकमत या प्रतिष्ठित वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात या गाडीचे संचालन केले जाणार आहे. 4 सप्टेंबर पासून ही गाडी चालवली जाणार असून यामुळे पनवेल ते चिपळूणचा प्रवास गतिमान होणार आहे.
कस राहणाऱ या गाडीचे वेळापत्रक
हाती आलेल्या माहितीनुसार ही गाडी चार सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी चार सप्टेंबर पासून पनवेल रेल्वे स्थानकावरून सकाळी 11 वाजून दहा मिनिटांनी चिपळूणकडे रवाना होणार आहे आणि दुपारी चार वाजता ही गाडी चिपळूणला पोहोचणार आहे.
तसेच चिपळूण वरून ही गाडी सायंकाळी साडेपाच वाजता पनवेलकडे रवाना होणार आहे आणि रात्री साडेदहा वाजता ही गाडी पनवेलला पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गाडीची रचना कशी असणार
या विशेष गाडीमध्ये बारा डबे राहणार आहेत. यामध्ये एक डब्बा महिलांसाठी राहणार आहे तर एक डब्बा फर्स्ट क्लासचा असेल. मात्र या गाडीसाठी आरक्षणाची सोय राहणार नाही. याचाच अर्थ ही अनारक्षित गाडी राहणार आहे. या गाडीसाठी रेल्वे प्रवाशांना करंट तिकीट बुकिंग करावी लागणार आहे. जुन्या रेल्वे स्थानकावर यासाठी तिकीट खिडकी सुरु केली जाणार आहे.
कसा राहणार रूट
ही गाडी पनवेलहुन रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सपे वामने, करंजाडी, विनहेरे, दिवाणखावटी, खेड, अंजनी, चिपळूण या मार्गाने प्रवास करणार आहे. ही गाडी या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर थांबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.