Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी कार्तिकी एकादशीच्या पूर्वीच एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर, कार्तिकी एकादशीला आणि आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठुरायांच्या नगरीत अर्थातच पंढरपूर मध्ये हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात.
दरम्यान, यावर्षीच्या कार्तिक एकादशीला देखील हजारोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त पंढरपुरात दाखल होणार आहेत. यंदा 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने भाविक भक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने हा निर्णय घेतला आहे. मिरज ते पंढरपूर आणि कुर्डूवाडी ते पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या विशेष गाडीची सुरुवात 20 नोव्हेंबर पासून होणार आहे. 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आखले आहे.
यामुळे यंदा कार्तिकी एकादशीला विठुरायाचे दर्शन सहजतेने घेता येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा हा निर्णय राज्यातील विठ्ठल भक्तांसाठी खूपच दिलासादायी ठरणार आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर ते मिरज दरम्यान चालवण्यात येणारी विशेष रेल्वे गाडी (गाडी क्रमांक 01443) 20, 21, 25 आणि 27 नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून सकाळी 9 वाजून वीस मिनिटांनी रवाना होईल आणि दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी मिरज येथे पोहोचणार आहे. तसेच मिरज ते पंढरपूर विशेष रेल्वे गाडी (गाडी क्रमांक 01444) 20, 21, 25 आणि 27 नोव्हेंबरला मिरजेतून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी रवाना होईल आणि सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01445 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत मिरज ते पंढरपूर दरम्यान चालवले जाणार आहे. ही गाडी मिरज येथून सकाळी आठ वाजता गेला आणि पंढरपूरला दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01446 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूर ते मिरज दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी पंढरपूर येथून सकाळी अकरा वाजता निघेल आणि दुपारी दोन वाजता मिरज येथे पोहचणार आहे.
मिरज-कुर्डुवाडी दरम्यान 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. या कालावधीत गाडी क्रमांक ०१४४७ मिरज रेल्वे स्थानकावरून दुपारी ४ वाजता रवाना होणार आहे आणि कुर्डुवाडी येथे रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच कुर्डुवाडी – मिरज दरम्यान 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत गाडी क्रमांक ०१४४८ ही गाडी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून रात्री ९ वाजता सुटणार आहे आणि मिरज येथे रात्री १ वाजता पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जतरोड, मसोबा डोंगरगाव, जवळे, वासुद, सांगोला या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
एकंदरीत कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने घेतलेला हा निर्णय कुर्डूवाडी आणि मिरज येथील विठुरायाच्या भाविकांसाठी खूपच दिलासादायक राहणार आहे. यामुळे कार्तिकी एकादशीच्या काळात पंढरपूरचा प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार आहे.