Maharashtra Railway News : दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या उल्लेखनीय वाढली आहे.
यामुळे नागरिकांना गावी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना रेल्वे मध्ये तिकीट मिळत नाहीये. यामुळे नाईलाज म्हणून नागरिकांना खाजगी वाहनाने तसेच बस ने प्रवास करावा लागत आहे. मात्र याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे.
दिवाळी सणाला सर्वसामान्यांचा खिसा यामुळे रिकामा होत आहे. हेच कारण आहे की रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे.
मध्य रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे मुंबई, नागपूर, दौंड मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की, मध्य रेल्वेच्या माध्यमातून नागपूर-मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- दानापूर आणि दुर्गापुरा (जयपूर)- दौंडदरम्यान सात अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत.
यामुळे दिवाळी निमित्ताने गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास सुरक्षित आणि जलद होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नागपूरहून मुंबईसाठी विशेष ट्रेन धावणार
खरंतर उपराजधानी नागपूर आणि विदर्भातून दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबईत दाखल होत असतात. दिवाळीच्या काळात तर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नागपूर ते मुंबई दरम्यान एकेरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर-मुंबई एकेरी विशेष गाडी १६ नोव्हेंबरला चालवली जाणार आहे. ही गाडी नागपूरहून सोळा तारखेला रात्री दहा वाजता रवाना होणार आहे आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचणार आहे. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे व दादर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई-दानापूर गाडीचे वेळापत्रक कसे राहणार
दिवाळीनिमित्त आणि छट पूजा निमित्त वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई ते दानापूर दरम्यान अतिजलद विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई-दानापूर गाडी १८ आणि २५ नोव्हेंबरला सोडली जाणार आहे.
ही विशेष ट्रेन या दोन दिवसांच्या कालावधीत मुंबई येथील CSMT येथून सकाळी ११.५ वाजता रवाना होणार आहे आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी दोनला पोहोचणार आहे. तसेच दानापूर- मुंबई अतिजलद विशेष गाडी १९ आणि २६ नोव्हेंबरला मध्य रेल्वेच्या माध्यमातून चालवली जाणार आहे.
ही गाडी या दोन दिवसांच्या कालावधीत दानापूर येथून दुपारी साडेचारला सुटणार आहे आणि CSMT Mumbai येथे दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाअकराला पोहोचणार आहे. यामुळे मुंबई ते दानापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास दिवाळीच्या काळातही जलद आणि आरामदायी होईल असे चित्र तयार होत आहे.
विशेष म्हणजे ही गाडी या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर थांबवली जाणार आहे. ही ट्रेन या मार्गावरील दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.