Maharashtra Railway News : 2024 च्या सरतेशेवटी राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी अनेकजण कोकण, गोवा अन दक्षिण भारतात जात असतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या याच पर्यटकांच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही विशेष गाडी आरक्षित राहणार असून या ट्रेनला कोकण रेल्वे मार्गावर चालवली जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे नववर्षाच्या स्वागतासाठी प्रवास करणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष एक्स्प्रेस चालवली जाणार आहे.
ही गाडी राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम सेंट्रल आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी हजरत निजामुद्दीन येथून आज २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.२० वाजता सुटेल अन ही रेल्वेगाडी तिरुअनंतपुरम सेंट्रलला तिसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचणार आहे.
तसेच तिरुअनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन आरक्षित उत्सव विशेष रेल्वेगाडी तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता सुटेल अन ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचणार आहे.
म्हणजे हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम सेंट्रल या विशेष ट्रेनची एक फेरी अन तिरुअनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन या विशेष एक्सप्रेस ट्रेनची एक फेरी चालवली जाईल. या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण दोन फेऱ्या होणार आहेत.
कुठं थांबणार?
कोकण रेल्वेने म्हटल्याप्रमाणे, या स्पेशल रेल्वेगाडीला कोटा, रतलाम, वडोदरा, उधना, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिवि, मडगाव, कारवार, कुमटा, मुकांबिका रोड, बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मंगलोर, कासारगोड, कन्नूर, कोझिक्कोडे, शोरानूर, त्रिसूर, अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम आणि वर्कला शिवगिरी येथे थांबा मिळणार आहे.