Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर राज्यासहित संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने शिवाय याचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वे प्रवासाला प्रवाशांच्या माध्यमातून नेहमीच पसंती दाखवली जाते.
रेल्वे प्रशासन देखील प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच सतर्क असते. प्रवाशांना प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाकडून नेहमीच नवनवीन निर्णय घेतले जात असतात. गर्दीच्या कालावधीमध्ये नवीन गाड्या सुरू केल्या जात असतात.
आता असाच एक निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने सिकंदराबाद ते भावनगर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब अशी की ही विशेष एक्सप्रेस ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून चालवली जाणार आहे.
ही गाडी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा राहणार आहे.यामुळे या विशेष एक्सप्रेस ट्रेन चा राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार अशी आशा आहे.
आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
सिकंदराबाद ते भावनगर (गाडी क्रमांक ०७०६९) आठवडी विशेष गाडी 19 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात हे गाडी सिकंदराबाद येथून दर शुक्रवारी रात्री ८ वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५.५५ वाजता भावनगर येथे पोहोचणार आहे.
तसेच भावनगर ते सिकंदराबाद (गाडी क्रमांक ०७०६२) आठवडी विशेष गाडी २१ जुलै ते १९ ऑगस्ट दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी भावनगर रेल्वे स्थानकावरून दर रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पावणेचार वाजता ही गाडी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
सिकंदराबाद ते भावनगर आणि भावनगर ते सिकंदराबाद या विशेष गाडीच्या प्रत्येकी चार फेऱ्या म्हणजे एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. आता आपण ही गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार हे पाहणार आहोत.
कोणत्या रेल्वे स्थानकावर घेणार थांबा
सिकंदराबाद ते भावनगर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नदिह, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, भुसावळ, नंदूरबार, सुरत, वरोदरा, अहमदाबाद, विरंगम, सुखनगर, बोटाड, ढोला, सोनगढ़, सिहोर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.