Maharashtra Railway News : राज्यातील मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मराठवाड्यातील नागरिकांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास गतिमान होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता पनवेल ते मराठवाड्यातील नांदेड दरम्यान विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष गाडीच्या पनवेल ते नांदेड दरम्यान चाळीस फेऱ्या होणार आहेत. यामुळे पनवेलहून मराठवाड्याला जाणाऱ्यांना आणि मराठवाड्याहून पनवेल ला जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी द्विसाप्ताहिक राहणार आहे म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हीही येत्या काही दिवसांत मराठवाड्यात जाऊ इच्छित असाल किंवा मराठवाड्यातून पनवेलकडे जाऊ इच्छित असाल तर तुम्हाला या विशेष एक्सप्रेस ट्रेनचा फायदा होणार आहे.
कसं असणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल-नांदेड उन्हाळी विशेष गाडी 23 एप्रिल ते 27 जून या कालावधीत चालवली जाणार आहे. ही विशेष गाडी या कालावधीत पनवेल रेल्वे स्थानकावरून प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी अडीच वाजता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच नांदेड-पनवेल उन्हाळी विशेष गाडी 22 एप्रिल ते 26 जून या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही उन्हाळी विशेष गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून सोमवारी आणि बुधवारी रात्री अकरा वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी एक वाजून पंचवीस मिनिटांनी पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
मध्य रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या उन्हाळी विशेष रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय झाला आहे.