Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी राजधानी मुंबई सांस्कृतिक राजधानी पुणे मराठवाड्यातील जालना आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास आहे. कारण की, महाराष्ट्राला लवकरच तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आहे. तेव्हापासून आजतागायत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या 34 मार्गांपैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातुन जात आहेत.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या महत्त्वाच्या मार्गावर सध्या स्थितीला वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
अशातच आता राज्यातील जनतेला सणासुदीच्या दिवसात आणखी तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे दिवाळीच्या काळात 9 वंदे भारत सुरू करणार आहे. यापैकी तीन वंदे भारत मध्ये रेल्वेला दिल्या जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला केंद्र शासनाकडून दिवाळी गिफ्ट म्हणून 3 वंदे भारत एक्सप्रेस भेट म्हणून दिल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या 3 मार्गावर सुरू होणार वंदे भारत ट्रेन
मीडिया रिपोर्टनुसार, दिवाळीच्या काळात देशातील नऊ मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. यापैकी सहा वंदे भारत एक्सप्रेस चे अजून मार्ग निश्चित झालेले नाहीत. मात्र तीन गाड्यांचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही मार्ग महाराष्ट्रातील आहेत.
मुंबई ते जालना, मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते सिकंदराबाद हे 3 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान या तीन मार्गांवर ही गाडी सुरू करण्यापूर्वी चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गावर ही गाडी सुरू केली जाईल.
या गाड्या नेमक्या केव्हा सुरू होणार, याचे वेळापत्रक कसे राहील याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु लवकरच याबाबत रेल्वे कडून सविस्तर माहिती पुरवली जाईल.