Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान मध्य रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार असल्याची बातमी हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
याही वर्षी यादरम्यान रेल्वे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. दरम्यान याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई/पुणे आणि नागपूर आणि नागपूर – भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवणार अशी माहिती समोर आली आहे.
यामुळे मुंबई पुणे नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना या गाड्यांचा फायदा होणार आहे. या काळात होणाऱ्यां अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी या गाड्या फायदेशीर ठरतील असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
यामुळे जर तुम्हीही या काळात रेल्वेने प्रवास करू इच्छित असाल तर तुम्हाला नक्कीच या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण या विशेष गाड्यांचे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असणार वेळापत्रक?
1)लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते नागपूर अनारक्षित स्पेशल 01017 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई 11.10.2024 रोजी 14.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.00 वाजता नागपूरला पोहोचणार आहे. तसेच नागपूर ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजेच ट्रेन क्रमांक 01018 नागपूरहून 13.10.2024 रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे.
2)नागपूर- एलटीटी स्पेशल गाडी क्रमांक 01218 नागपूरहुन 12.10.2024 रोजी 22.05 वाजता सोडली जाणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 14.35 वाजता पोहोचणार आहे.
3)नागपूर- पुणे अनारक्षित स्पेशल (गाडी क्रमांक 01215) ही ट्रेन 12.10.2024 रोजी नागपूरहून 23.00 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 20.00 वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
4) पुणे – नागपूर सुपरफास्ट स्पेशल (गाडी क्रमांक 01216) ही पुण्याहून 11.10.2024 रोजी 16.00 वाजता निघणार आहे आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी 06.45 वाजता पोहोचणार आहे.
5)भुसावळ-नाशिक रोड-नागपूर मेमू (गाडी क्रमांक 01213) ही ट्रेन 12.10.2024 रोजी भुसावळहून 04.25 वाजता सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी 12.00 वाजता नागपूरला पोहोचणार आहे. तसेच, गाडी क्रमांक 01214 ही मेमू नागपूरहून 12.10.2024 रोजी 23.40 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 14.10 वाजता नाशिकरोडला पोहोचणार आहे.