Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात.
यामुळे सणासुदीच्या काळात अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट देखील मिळत नाही. हेच कारण आहे की सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून काही अतिरिक्त गाड्या चालवल्या जातात.
दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत ही रेल्वे प्रशासन विविध रेल्वे मार्गांवर विशेष गाड्या चालवत असते. दरम्यान नागपूर ते बिहार दरम्यानही रेल्वे प्रशासनाने विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर ते बिहार येथील समस्तीपुर दरम्यान ही विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात या मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते, अशा परिस्थितीत रेल्वेचा हा निर्णय या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना नक्कीच दिलासा देणारा ठरणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
नागपूर-समस्तीपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी 30 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी नागपूर स्थानकावरून सकाळी 10 वाजून 40 वाजता सोडली जाईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता समस्तीपूर स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच, समस्तीपूर-नागपूर साप्ताहिक विशेष गाडी समस्तीपूर स्थानकावरून 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे. ही ट्रेन दर गुरुवारी रात्री 23 वाजून 45 मिनिटांनी सोडली जाणार आहे तिसऱ्या दिवशी 11 वाजून 50 मिनिटांनी नागपूरला पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
मिळालेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला बैतुल, इटारसी, भोपाळ जंक्शन, लक्ष्मीबाई झांसी जंक्शन, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बाराबंकी जंक्शन, गोंडा जंक्शन, बस्ती, गोरखपूर जंक्शन, छपरा, हाजीपूर जंक्शन, मुझफ्फरपूर जंक्शन या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.