Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रातील मुंबईमधून लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवणार असल्याची बातमी हाती येत आहे.
मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनल ते गया दरम्यान ही नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. येत्या काही दिवसांनी ही गाडी सुरू होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
ही एक साप्ताहिक ट्रेन राहणार असून यामुळे मुंबई ते गया आणि गया ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक नेमके कसे राहील या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ही गाडी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून सुरू होणार आहे. त्यामुळे या गाडीचा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना देखील मोठा फायदा होणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक ?
ही साप्ताहिक एक्स्प्रेस गया येथून प्रत्येक बुधवारी सायंकाळी ७ वाजता निघणार आहे आणि गुरुवारी दुपारी ३ वाजता नागपुरात दाखल होईल, तिसर्या दिवशी पहाटे ५.५० वाजता मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनल या गंतव्यस्थानी पोहोचणार आहे.
तसेच ही साप्ताहिक गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता एलटीटी येथून रवाना होऊन शनिवारी रात्री नागपुरात तर रविवारी रात्री १०.५० वाजता गया या आपल्या गंतव्यस्थानी पोहचणार आहे.
कोणत्या स्थानकावर थांबा घेणार?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही साप्ताहिक विशेष गाडी या मार्गांवरील कोडेरामा, हजारीबाग टाऊन, बरकाकाना, मेरसा, रांची, राऊरकेला, झारसुगुडा, रायगड, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक व कल्याण या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
यामुळे विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्राच्या रेल्वे प्रवाशांना सणासुदीच्या काळात नक्कीच मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.