Maharashtra Railway News : आज पासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. यामुळे सध्या सर्वत्र मोठे उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी सणानिमित्त अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दिवाळीच्या काळात एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
ती म्हणजे प्रवाशांची संख्या घेता रेल्वे प्रशासनातर्फे बिलासपूर ते एलटीटी-लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे मुंबई ते बिलासपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई व बिलासपूरच्या दिशेने जाणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, बिलासपूर- एलटीटी विशेष गाडी (गाडी क्रमांक ०८२९३) २९ ऑक्टोबरला बिलासपूर येथून सकाळी ९.३५ वाजता रवाना होणार आहे. नागपूर स्थानकावर सायंकाळी ४.२० वाजता आणि ३० तारखेला सकाळी ८ वाजता एलटीटी स्थानकावर दाखल होणार आहे.
परतीच्या प्रवासात (गाडी क्रमांक ०८२९४) एलटीटी- बिलासपूर विशेष गाडी ३० ऑक्टोबरला सकाळी ११.५० वाजता रवाना होणार आहे अन नागपूर येथे रात्री १.५० वाजता पोहोचणार आहे व बिलासपूरला ३१ ऑक्टोबरला सकाळी ८.५० वाजता पोहचणार आहे.
ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ते बिलासपुर आणि बिलासपुर ते मुंबई दरम्यान धावणारी ही विशेष एक्सप्रेस गाडी दोन्ही दिशांनी 11 रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
या मार्गावरील रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.