Maharashtra Railway News : मुंबई-हावडा मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील तब्बल 35 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रेल्वेचा हा निर्णय रेल्वे प्रवाशांना थोडासा मनस्ताप देणारा राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील राजनांदगाव- कळमना दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कामासाठी या रेल्वे गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. या कामामुळे 7 ऑक्टोबर अर्थातच आज पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंतच्या जवळपास 35 रेल्वे गाड्या रद्द राहणार आहेत.
यामध्ये पुण्याहून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा देखील समावेश आहे. निश्चितच रेल्वे विभागाने घेतलेला हा निर्णय रेल्वे प्रवाशांसाठी थोडासा त्रासदायक सिद्ध होऊ शकतो. या कालावधीमध्ये रेल्वे प्रवाशांना रद्द झालेल्या गाड्या पाहून आपल्या प्रवासाचे नियोजन या ठिकाणी करावे लागणार आहे.
खरंतर या चालू ऑक्टोबर महिन्यात 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक रेल्वेने प्रवास करणार आहेत. नवरात्र उत्सवामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अशातच रेल्वे विभागाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना दरम्यान तिसऱ्या मार्गाचे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले असल्याने सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांना थोडासा अडचणीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या 35 रेल्वे गाड्या रद्द राहणार आहेत याविषयी जाणून घेऊया.
कोणत्या रेल्वे गाड्या होणार रद्द
1)दुर्ग-गोंदिया मेमू (११ ते १३ ऑक्टोबर)
2)गोंदिया-दुर्ग मेमू (१२ ते १४)
3) गोंदिया- इतवारी मेमू (११ ते १३)
4) इतवारी-गोंदिया मेमू (१२ ते १४)
5) इतवारी-रामटेक (१० ते १३)
6) रामटेक- इतवारी (१० ते १३)
7) इतवारी-रामटेक मेमू (११ ते १४)
8) रामटेक-इतवारी मेमू (११ ते १४)
9) रायपूर- इतवारी (१० ते १३)
10 इतवारी- रायपूर (११ ते १४)
11) गोंदिया-इतवारी (११ ते १४)
12) इतवारी-बलाघाट (११ ते १४)
13) बालाघाट-इतवारी (११ ते १४)
14) गेवरा रोड-इतवारी शिवनाथ एक्स्प्रेस (८ ते १३)
15) इतवारी-कोरबा शिवनाथ एक्स्प्रेस (८ ते १३)
16) बिलासपूर-इतवारी इंटरसिटी (८ ते १३)
17) इतवारी-बिलासपूर इंटरसिटी (९ ते १४)
18) भुवनेश्वर-कुर्ला (९ ऑक्टोबर)
19) कुर्ला-भुवनेश्वर (११)
20) सिकंदराबाद-रायपूर (११ व १३)
21) रायपूर- सिकंदराबाद (१२ व १४)
22) बिलासपूर- पुणे (१२ ऑक्टोबर)
23) पुणे- बिलासपूर (१३ ऑक्टोबर)
24) पुरी-जोधपूर (११)
25) जोधपूर-पुरी (१४)
26) पोरबंदर- संत्रागाछी (१३ ऑक्टोबर)
27) संत्रागाछी- पोरबंदर (१५ ऑक्टोबर)
दरम्यान रेल्वे विभागाकडून प्रवाशांना रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचे वेळापत्रक पाहून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. निश्चितच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना थोडासा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र 15 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा या गाड्या पूर्व पदावर येणार आहेत.