Maharashtra Railway News : सणासुदीच्या दिवसात राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, येत्या काही दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाचा सण साजरा होणार आहे.
नवरात्र उत्सव आणि विजयादशमीच्या सणामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात मुंबईहून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ विभागातील बुधनी बरखेरा स्थानकादरम्यान तिसरी लाईन सुरु करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. या कामामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या आणि मुंबईहून धावणाऱ्या तब्बल 4 एक्सप्रेस ट्रेन रद्द केल्या जाणार आहेत.
तसेच मुंबईमधून धावणाऱ्या आणि मुंबईमध्ये येणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात देखील बदल करण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार असून रद्द झालेल्या गाड्यांचे वेळापत्रक पाहून प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.
कोणत्या गाड्या राहतील रद्द?
26 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी एलटीटी-राणी कमलापती एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आली आहे.
27 ऑक्टोबर रोजी राणी कमलापती- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दरम्यान धावणारी एक्सप्रेस ट्रेन सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
16 ते 26 ऑक्टोबर दरम्यान मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते हरिद्वार दरम्यान धावणारी एक्सप्रेस या कामामुळे रद्द करण्यात आले आहे.
17 ते 27 ऑक्टोबर दरम्यान हरिद्वार ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी एक्सप्रेस देखील या इंटरलॉकिंगच्या कामामुळे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी घेण्यात आला आहे.
कोणत्या गाड्यांच्या मार्गात झालाय बदल ?
15 ते 27 ऑक्टोबर दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान धावणारी कामयानी एक्सप्रेस इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे चालवली जाणार आहे.
24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान धावणारी एक्सप्रेस इटारसी, जबलपूर कटनी मार्गे चालवली जाणार आहे.
15 ते 27 ऑक्टोबर दरम्यान वाराणसी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी कामयानी एक्सप्रेस कटनी, जबलपूर, इटारसी मार्गे धावणार आहे.
24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान गोरखपुर ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी एक्सप्रेस कटनी जबलपूर इटारसी मार्गे धावणार आहे.