Maharashtra Railway Cyclone : रेल्वे हे राज्यासह संपूर्ण देशात प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे.
दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचौंग चक्रीवादळाचा आता रेल्वेला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
हे या हंगामातील तिसरे चक्रीवादळ असून उद्या हे चक्रीवादळ तामिळनाडू अन आंध्रप्रदेशला धडकण्याची शक्यता आहे.
यामुळे या संबंधित भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे रेल्वे प्रशासनाने देखील या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या चक्रीवादळाचा धोका पोहोचू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.
याच खबरदारीचा एक भाग म्हणून रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातून धावणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेनला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या गाड्यां राहणार रद्द
रेल्वे प्रशासनाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातून धावणाऱ्या नवजीवन एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी तीन दिवस धावणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२६५६ चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस ०३ ते ०५ डिसेंबर या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.
तसेच गाडी क्रमांक १२६५५ अहमदाबाद – चेन्नई नवजीवन एक्सप्रेस ०४ ते ०६ डिसेंबर या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने ही गाडी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याने या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना थोडा काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.