Maharashtra Railway : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मध्य रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.
याबाबत मध्ये रेल्वेच्या प्रशासनाने सविस्तर अशी माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या माध्यमातून नागपूर ते मुंबई दरम्यान तीन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
यासोबतच सीएसएमटी ते कलबुर्गी आणि कलबुर्गी ते सीएसएमटी अशी प्रत्येकी एक विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे.
यामुळे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या अनुयायांचा प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे रेल्वे प्रवाशांनी स्वागत केले आहे.
दरम्यान आता आपण नागपूर ते सीएसएमटी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान चालवल्या जाणाऱ्या आणि कलबुर्गी ते सीएसएमटी तसेच सीएसएमटी ते कलबुर्गी या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार नागपूर-CSMT वेळापत्रक ?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर – सीएसएमटी ट्रेन ४ डिसेंबर रोजी रात्री ११:५५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता पोहोचणार आहे.
तसेच दुसरी विशेष एक्सप्रेस गाडी नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुटून सीएसएमटीला त्याचदिवशी रात्री ११:४५ वाजता पोहचणार आहे.
विशेष गाडी नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी ३:५० वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता पोहोचणार आहे.
कसं राहणार कलबुर्गी-सीएसएमटी वेळापत्रक
मध्य रेल्वेने दिलेले माहितीनुसार, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर कलबुर्गी-सीएसएमटी विशेष गाडी कलबुर्गी येथून ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजता रवाना होणार आहे आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८:२० वाजता पोहोचणार आहे.
तसेचं सीएसएमटी ते कलबुर्गी विशेष गाडी ६ डिसेंबर रोजी रात्री १२:२५ वाजता राजधानी मुंबई येथून सुटणार आहे आणि कलबुर्गीला सकाळी साडेअकरा वाजता पोहोचणार आहे.