Maharashtra Pm Kisan News : केंद्र शासनाने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना असे या योजनेचे नाव. केंद्रीय पुरस्कृत या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
हा लाभ मात्र एका आर्थिक वर्षात तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. म्हणजेच दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याच प्रावधान केंद्र शासनाने करून ठेवले आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील तमाम पात्र शेतकऱ्यांना 13 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत.
अर्थातच ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा सुरुवातीपासून लाभ घेतला असेल त्यांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत 26 हजार रुपये मिळाले असतील. दरम्यान या योजनेचा चौदावा हप्ता हा मे महिन्याच्या शेवटी म्हणजेच या चालू महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असा दावा केला जात आहे.
हे पण वाचा :- मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची नापसंती; ‘या’ कारणामुळे मात्र दोन महिन्यात प्रवासी संख्या झाली कमी, वाचा….
कृषी विभागातील काही अधिकार्यांनी याला दुजोरा देखील दिला आहे. अर्थातच आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चौदावा हप्ता मिळणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.
मात्र हा हप्ता पी एम किसान योजनेच्या ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक केले आहे अशाच शेतकऱ्यांना देऊ केला जाणार आहे. मात्र पीएम किसान योजनेचे पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी बीबीसी मराठीला एक मोठी माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 12 लाख 91 हजार पीएम किसानच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांक अशी लिंक केलेले नाही. म्हणजेच या 13 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा हा 14 वा हप्ता मिळणार नसल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! पुण्याच्या युवा शेतकऱ्यांनी सफरचंद शेती यशस्वी करून दाखवली, कोणत्या जातीच्या रोपांची केली लागवड, पहा….
याबाबत कृषी आयुक्तालयाकडून स्पष्ट निर्देश निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना आता पुढील हफ्ता मिळवण्यासाठी आपले बँक खाते आधार क्रमांकसोबत ताबडतोब लिंक करावे लागणार आहे.
विशेष म्हणजे शासनाने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे लागणार आहे.
आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाच्या मदतीने हे खाते उघडले जाईल आणि ते उघडल्यानंतर पंधरा दिवसात बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक होणार आहे. विशेष म्हणजे पोस्ट बँकेत खोललेले हे खाते आपोआप पीएम किसान योजनेशी जोडले जाणार आहे.