Maharashtra Onion Rate : लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात दबावात होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळाली आणि याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला बसला. महायुती मधील अनेक दिग्गज नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
कांद्याच्या मुद्द्याने या दिगजांना आसमान दाखवले होते. पण विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला. काल, विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता येत्या 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान, निवडणूक झाली असल्याने आता कांद्याचे बाजार भाव दबावात येणार की काय अशी भीती आता व्यक्त होताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रात कांद्याला चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान भाव मिळतोय. कमाल बाजार भाव तर अनेक ठिकाणी पाच हजार रुपये प्लस आहेत.
काही ठिकाणी सहा हजाराच्या वरही दर मिळतोय. पण निवडणूक झाल्यानंतर कांद्याचे भाव पडतील? अशी भीती आहे. दरम्यान याच संदर्भात बाजार अभ्यासकांनी मोठी माहिती दिली आहे. बाजार अभ्यासाकांनी सांगितल्याप्रमाणे सध्या कांद्याचे बाजार भाव तेजीत असण्याचे कारण म्हणजे पुरवठा.
कांद्याचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने कांद्याला सध्या विक्रमी दर मिळतोय. सध्या देशात उपलब्ध कांद्याचे प्रमाण फारच कमी आहे. शिवाय यंदा खरिपातील कांदा लागवड वाढली असली तरी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले आहे. तसेच लेट खरिपातील कांदा लागवडही घटली आहे.
सध्या खरीप हंगामातील कांद्याची अपेक्षित आवक होत नाहीये. बाजार अभ्यासकांनी खरीपातील कांद्याचे उत्पादनच कमी झाले असल्याने बाजारात खरीप हंगामातील लाल कांदा फारच कमी प्रमाणात विक्रीसाठी दाखल होत असून लेट खरीप हंगामात देखील कांद्याची लागवड फारच कमी प्रमाणात झाली आहे.
यामुळे कांद्याची उपलब्धता आणखी काही दिवस कमीच राहणार आहे. हेच कारण आहे की बाजारातील अभ्यासकांनी आगामी काही आठवडे बाजारात कांद्याचे दर असेच तेजीत राहणार असा अंदाज दिला आहे.
पुढील काही आठवड्यांमध्ये खरिपातील कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल, असे चित्र आहे. यामुळे पुढील काही आठवडे कांद्याचे दर तेजीत राहतील आणि त्यानंतर बाजारभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.