Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आजचा दिवस. यामुळे आज आपण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कांद्याला नेमका काय दर मिळाला आहे या संदर्भात थोडक्यात आढावा घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 6000 आणि सरासरी 2600 रुपये असा दर मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1800, कमाल 4500 आणि सरासरी 3500 असा दर मिळाला आहे.
छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 3700 आणि सरासरी 2350 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 200, कमाल 5000 आणि सरासरी 3600 असा भाव मिळाला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 300, कमाल 7000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1501, कमाल 6701 आणि सरासरी 3200 असा सरासरी दर मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 5415 आणि सरासरी 4000 असा दर मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान दोन हजार कमाल, 4501 आणि सरासरी 3900 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : कोपरगाव च्या बाजारात आज लाल कांद्याला किमान 1000, कमाल 3604 आणि सरासरी 2650 असा दर मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 1600, कमाल 3600 आणि सरासरी 3 हजार 11 असा दर मिळाला आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान 500, कमाल 2500 आणि सरासरी 2 हजार मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान चार हजार, कमाल 5200 आणि सरासरी 4250 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 3400, कमाल 6180 आणि सरासरी 5650 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान 3000, कमाल 5751 आणि सरासरी 5400 असा भाव मिळाला आहे.