Maharashtra Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळतोय. विशेष म्हणजे भारतात अफगाणिस्तानच्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आयात होत असतानाही राज्यातील कांद्याला चांगला विक्रमी दर मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि अमृतसरच्या बाजारांमध्ये अफगाणिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहे.
हा कांदा पाकिस्तान मार्गे आपल्या भारतात दाखल होत आहे. नजीकच्या काळात हा कांदा देशातील इतरही बाजारांमध्ये पाहायला मिळू शकतो आणि यामुळे कदाचित बाजारभावात घसरण होईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे. तथापि, अफगाणिस्तानच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रातील कांदा हा अधिक चविष्ट असून याला बाजारांमध्ये अधिक मागणी आहे.
यामुळे, अजूनही बाजारभावात महाराष्ट्रातील कांद्याला चांगला दर मिळतोय. दरम्यान, आज आपण आठवड्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख बाजारात उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3051 आणि सरासरी 2850 असा भाव मिळाला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3170 आणि सरासरी 2900 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1200, कमाल 3192 आणि सरासरी 2800 रुपये भाव मिळाला आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती : बागलांच्या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 805, कमाल 2950 आणि सरासरी 2775 असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : संगमनेरच्या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 400, कमाल 3125 आणि सरासरी 1763 असा भाव मिळाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 850, कमाल 2892 आणि सरासरी 2760 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3 हजार 61 आणि सरासरी 2850 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1052, कमाल 3001 आणि सरासरी 2851 चा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3130 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : येवल्याच्या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 850, कमाल 2841 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.