Maharashtra Onion Rate : कांदा बाजार भावात गेल्या काही दिवसांपासून चांगली तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील जवळपास सर्वच बाजारांमध्ये कांद्याचे भाव दबावात होते. बाजारभाव अक्षरशः शंभर रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्च आणि वाहतुकीचा खर्च सुद्धा भरून काढता येणे अशक्य झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाचाही फारसा फायदा होत नसल्याचे वास्तव होते.
कारण की निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क कायमचं होते. पण आता देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमधून कांद्याला मोठी मागणी आली आहे. महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेकडील राज्यांमधून उठाव मिळत असल्याने व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने कांद्याची खरेदी होत आहे.
गेल्या आठवडाभरापासून कांदा दरात चांगली तेजी आहे. सरासरी बाजार भाव आता तब्बल 2500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. कमाल बाजार भाव तर काही ठिकाणी 4000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले आहेत.
यामुळे कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादकांचे जे नुकसान झाले होते ते नुकसान आता भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील आजचे कांद्याचे बाजार भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 3300 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 500, कमाल 3500 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 3810 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 400, कमाल 3700 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान एक हजार आठशे, कमाल 3150 आणि सरासरी 2825 असा भाव मिळाला आहे.
अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 1500, कमाल 3500 आणि सरासरी 2500 असावा मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 800, कमाल 3000 आणि सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 3000, कमाल 4000 आणि सरासरी 3500 असा भाव मिळाला आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान एक हजार तीनशे, कमाल 3,100 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3111 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1100, कमाल 3501 आणि सरासरी 2800 रुपये भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1251, कमाल 3301 आणि सरासरी 351 असा भाव मिळाला आहे.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 3011 आणि सरासरी 2850 असा भाव मिळाला आहे.
सिन्नर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3173 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 700, कमाल 3500 आणि सरासरी 3100 असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3500 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.