Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्रिसिल रिपोर्ट बाबत मोठ्या चर्चा रंगत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी क्रिसिल रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, किरकोळ बाजारात या महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थातच ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून कांदा भावात मोठी वाढ होणार आहे.
या रिपोर्टनुसार, किरकोळ बाजारात कांदा तब्बल 70 रुपये प्रति किलो पर्यंत विकला जाईल असा अंदाज आहे. सदर रिपोर्टनुसार या महिन्याच्या अखेरपासून कांद्याची आवक कमी होणार आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही आवक कमीच राहणार आहे. आवक कमी राहणार असल्याने बाजार भावात मोठी वाढ होईल आणि किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 70 रुपयांपर्यंत पोहोचतील असा अंदाज या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे.
हे बाजारभाव सप्टेंबर महिन्यापर्यंत तेजीत राहतील, नंतर ऑक्टोबर महिन्यात बाजारभावात घसरण होणार असा अंदाज देखील या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे. ऑक्टोबर मध्ये खरीप हंगामातील नवा कांदा बाजारात येणार असल्याने बाजारभावात घसरण होऊ शकते असे सांगितले जात आहे. निश्चितच एक महिना का होईना पण जर बाजारभावात विक्रमी वाढ झाली तर याचा फायदा राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणारा असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे आता कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्यास सुरुवात देखील झाली आहे. कालच्या लिलावात राज्यात कांदा दरात विक्रमी वाढ नमूद करण्यात आली आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमीं दर?
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कालच्या लिलावात कांद्याला तब्बल 3 हजार 300 रुपये प्रति क्विंटलचा कमाल भाव नमूद करण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मार्केटमध्ये काल 366 क्विंटल एवढी कांदा आवक झाली. यात चांगल्या एक नंबरच्या कांद्याला 3300 पर्यंतचा भाव मिळाला आहे, तर किमान दर बाराशे रुपये आणि सरासरी बाजार भाव 2250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.