Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील कांदा उत्पादकांसाठी अधिक खास आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर तेजीत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. मात्र वाढीव बाजारभावामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट पूर्णपणे कोलमले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा आहे. परंतु वाढीव बाजारभावामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मात्र भरून काढता येणे शक्य झाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून आज राज्यातील एका बाजारात कांद्याला तब्बल 7400 प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. दरम्यान, बाजारातील अभ्यासकांनी कांद्याच्या भाववाढीतून सर्वसामान्य जनतेला लवकरच दिलासा मिळण्याची आशा दिसत नसल्याचे म्हटले आहे.
त्याचे कारण असे की, कांद्याच्या घाऊक भावाने महाराष्ट्रात विक्रम केला आहे. सध्या कांद्याची आवक कमी असल्याने बहुतांश बाजारपेठेत कांद्याचे भाव तेजीत आहेत. राज्यातील काही बाजारात त्याचे दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या प्लस झालेत.
तसेच, राज्यातील इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 7400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. किरकोळ किमतीबद्दल बोलायचे झाले तर अनेक राज्यांमध्ये कांदा 60 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे.
सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात किरकोळ बाजारात कांदा शंभरी गाठणार की काय अशी परिस्थिती आता बनू लागली आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणकोणत्या बाजारांमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
या बाजारात मिळाला सर्वाधिक दर
इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या बाजारात कांद्याला किमान 3000, कमाल 7400 आणि सरासरी 5200 असा विक्रमी भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 2500, कमाल 6500 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 6500 आणि सरासरी 2600 असा दर मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 2400, कमाल 6500 आणि सरासरी 5411 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3700, कमाल 6,415 आणि सरासरी 5800 असा भाव मिळाला आहे.