Maharashtra Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू दिसू लागले आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार कांदा बाजार भावात आता वाढ झाली आहे. खरे तर डिसेंबर 2023 मध्ये म्हणजेच जेव्हा केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला तेव्हापासून कांद्याचे भाव दबावात होते.
निवडणुकीच्या काळात घाई घाईने सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जेव्हा केंद्राने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा विकला गेला आणि त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
यामुळे, लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला सुद्धा मोठा फटका बसला. भारतीय जनता पक्षाला 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये म्हणजे सलग दोनवेळा स्वबळावर बहुमत प्राप्त करता आले. मात्र 2024 च्या निवडणुकीत असे होऊ शकले नाही.
महाराष्ट्रात तर सत्ताधाऱ्यांना म्हणजेच महायुती मधील घटक पक्षांना सर्वाधिक फटका बसला. पण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अन केंद्रात नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर कांदा बाजारचे चित्र पलटले आहे.
राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळत आहे. आज कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
या मार्केटमध्ये कांद्याला किमान तीन हजार पाचशे आणि सरासरी 4000 असा भाव मिळाला आहे. दरम्यान, आता आपण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नगर मधील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय?
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान एक हजार, कमाल 3,100 आणि सरासरी 2050 असा भाव मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये एक नंबर कांद्याला किमान 2000, कमाल 2300 आणि सरासरी 2150 असा भाव मिळाला आहे. तसेच या बाजारात नंबर तीन कांद्याला किमान 700, कमाल 1800 आणि सरासरी 1250 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 300, कमाल 3200 आणि सरासरी 2300 असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 300, कमाल 3300 आणि सरासरी 1800 रुपयेचा भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2952 आणि सरासरी 2750 असा दर मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार, कमाल 2,980 आणि सरासरी 2830 असा दर मिळाला आहे.