Maharashtra Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर कार गणपती बाप्पा पावला आहे. कांद्याच्या बाजारभावात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज राज्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल सहा हजार रुपये प्रति क्विंटालाचा कमाल भाव मिळाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. खरे तर लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला फारच कवडीमोल दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली.
याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत सत्ताधार्यांना भोगाव लागला. ज्या ठिकाणी कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते त्या ठिकाणी महायुतीचे जवळपास सर्वच उमेदवार पराभूत झालेत. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव सुधारले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीपासून आत्तापर्यंत कांद्याचे भाव टिकून आहेत. तसेच आगामी काळातही कांद्याचे भाव टिकूनच राहतील असे दिसत आहे. जोपर्यंत लाल कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत बाजार भाव खाली येणार नाहीत असे बाजाराचे सध्याचे समीकरण सांगत आहे.
यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये आज कांद्याला नेमका काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव खालील प्रमाणे
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 6000 आणि सरासरी 5200 असा विक्रमी दर मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 2431, कमाल 5500 आणि सरासरी 4900 असा भाव मिळाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 1800, कमाल 5390 आणि सरासरी चार हजार रुपये असा दर मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 5300 आणि सरासरी 3300 असा विक्रमी दर मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार या बाजारात आज किमान 3600, कमाल 5200 आणि सरासरी 4400 असा भाव मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 2200, कमाल 5200 अन सरासरी 4450 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्येही आज उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3000, कमाल 5400 आणि सरासरी 4700 असा दर मिळाला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3500, कमाल 5000 आणि सरासरी 4200 असा भाव मिळाला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट : या मार्केटमध्ये कांद्याला किमान चार हजार 100, कमाल 5000 आणि सरासरी 4550 असा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 3100, कमाल 5001 आणि सरासरी चार हजार तीनशे असा भाव मिळाला आहे.