Maharashtra Onion Rate : काल, दिनांक 10 जानेवारी रोजी राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर घसरलेत. नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी झालेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधीच कांद्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे मात्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढावा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
कालच्या लिलावात राज्यातील सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. इतर बाजारात मात्र कांद्याचे दर दबावातच पाहायला मिळाले. दरम्यान आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांद्याचे बाजार भाव थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय?
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये लोकल कांद्याला किमान 500, कमाल 2800 आणि सरासरी 1700 असा दर मिळाला. तसेच लाल कांद्याला किमान 450, कमाल 2651 आणि सरासरी 1700 असा भाव मिळाला.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान दोन हजार, कमाल 2700 आणि सरासरी 2500 असा भाग मिळाला.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान एक हजार, कमाल 2800 आणि सरासरी 1900 असा भाव मिळाला.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान दोन हजार, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे लाल कांद्याला किमान 200, कमाल 1750 अन सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे लाल कांद्याला किमान 1200, कमाल 1800 आणि सरासरी 1500 असा भाव मिळाला.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 800, कमाल 3000 आणि सरासरी दोन हजाराचा भाव मिळाला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 2700 आणि सरासरी 1850 असा भाव मिळाला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 618, कमाल 2310 अन सरासरी 1834 असा दर मिळाला तसेच पोळ कांद्याला येथे किमान 600, कमाल 2599 आणि सरासरी 2150 असा दर मिळाला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1250, कमाल 2850 आणि सरासरी 2400 रुपयाचा भाव मिळाला.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे लोकल कांद्याला किमान 2000, कमाल 4000 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला. हा राज्यातील सर्वाधिक भाव ठरला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 300, कमाल 3250 आणि सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.