Maharashtra Onion Market Rate : लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्रातील सरकारने घाईघाईने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात सुरू करताना मात्र सरकारने काही जाचक अटी लावल्या आहेत. निर्यात सुरू करण्यात आली आहे पण किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क देखील लागू आहे. यामुळे कांदा निर्यात सुरू असली तरी देखील भारतातून अपेक्षित निर्यात होत नाहीये.
शिवाय जागतिक बाजारात भारतीय कांदा हा इतर देशांच्या तुलनेत महाग आहे. पाकिस्तानचा कांदा हा भारतीय कांद्यापेक्षा निम्म्याने कमी किमतीत उपलब्ध होत आहे. यामुळे जागतिक बाजारांमध्ये पाकिस्तानच्या कांद्याला अधिक मागणी आली आहे. गेल्या चार महिन्यात भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीत मोठी घट आली आहे.
यामुळे कांदा निर्यातीसाठी लागू करण्यात आलेल्या जाचक अटी रद्द केल्या पाहिजे अशी मागणी आता जोर धरत आहे. दरम्यान, आज राज्यातील विदर्भ विभागातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3000, कमाल 4000 आणि सरासरी 3500 चा भाव मिळाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील इतर प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 2960 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 3000 आणि सरासरी 2400 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1100, कमाल 2900 आणि सरासरी 2651 रुपये भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2905 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1100, कमाल 2691 आणि सरासरी 2550 असा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 950, कमाल 2851 आणि सरासरी 2400 असा भाव मिळाला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 3250 आणि सरासरी 2125 असा भाव मिळाला आहे.
अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 3200, कमाल 3600 आणि सरासरी 3250 असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान 500, कमाल 3200 आणि सरासरी 2550 असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 3500 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.