Maharashtra News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसची मोठी धूम आहे. या एक्सप्रेसची संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चा स्पीड वाढवण्यासाठी आता रेल्वे विभागाकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक ही इतर सामान्य रेल्वेच्या तुलनेत अधिकच गतिमान आहे. मात्र असे असले तरी या रेल्वेचा स्पीड वाढवण्यासाठी ॲल्युमिनियम चा वापर करून याच्या डब्यांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जर ॲल्युमिनियमच्या माध्यमातून या वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती झाली तर 20 किलोमीटर प्रति तास इतका वेग वंदे भारत ट्रेन चा वाढणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतात सेमी हाय स्पीड रेल्वे वंदे भारतचा तासी कमाल स्पीड हा 180 किलोमीटर प्रति तास आहे. मात्र सध्या स्थितीला महाराष्ट्रात सूरु असलेल्या वंदे भारत रेल्वे ह्या 130 किलोमीटर प्रतितास या वेगानेच धावत आहेत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! नासिक-पुणे रेल्वेसाठी दिलेली स्थगिती नजरचुक, महारेलचा दावा; आता सुरू होणार का भूसंपादन, वाचा?
याशिवाय नुकतीच रेल्वेच्या ताब्यात आलेली मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मात्र 110 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चा स्पीड कमी होण्यामागे अनेक तांत्रिक अडचणी आहेत मात्र या ट्रेनचा स्पीड वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत या वंदे भारत ट्रेनचा कमाल स्पीड 180 किलोमीटर प्रति तास असून यामध्ये अजून वाढ करण्याचा मानस शासनाचा आहे. यासाठी वंदे भारतचे डबे ॲल्युमिनियमचे बनवले जाणार आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर हे काम होणार असून जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतीय रेल्वेसाठी हा एक गेम चेंजर ठरणार आहे. विशेष म्हणजे याआधी युरोपियन देशात या प्रकारचा प्रयोग यशस्वी झाला आहे यामुळे हा प्रयोग निश्चितच सक्सेसफुल होईल असा आशावाद या निमित्ताने संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर 200 वंदे भारत ट्रेन तयार होणार आहेत.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ झाली फिक्स; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार निर्णय
याच्या निर्मितीसाठी आणि देखभालीसाठी निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. 58 हजार कोटी रुपयांचा कंत्राट यासाठी काढण्यात आला आहे. या दोन चे वंदे भारत एक्सप्रेस पैकी 100 वंदे भारत ट्रेनचे डबे हे ॲल्युमिनियमचे राहणार आहेत. विशेष म्हणजे स्टीलच्या तुलनेत ॲल्युमिनियम चे डबे महाग जाणार आहेत. पण यामुळे स्पीड वाढणार आहे. विशेष बाब अशी की, भारत एक्सप्रेस लवकरच लांब पल्ल्याच्या रूटवर देखील धावणार आहे.
लवकरच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसच्या काही गाड्या देखील ॲल्युमिनियम वापर करून बनवण्याचा निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे 2024 च्या पहिल्या तिमाही मध्ये स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. निश्चितच, यामुळे प्रवाशांची मोठी सोय या ठिकाणी होणार आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस : आता नागपूरसह संपूर्ण राज्यात ‘ही’ वंदे भारत ट्रेन धावणार; नितीन गडकरीचा मास्टर प्लॅन आला नवीन स्वरूपात