Maharashtra News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. महिला, विद्यार्थी, विधवा महिला, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तीं इत्यादींसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत.
राज्यातील निराधार लोकांसाठी देखील शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू आहेत.यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना यांचा समावेश होतो.
या सर्व योजनेअंतर्गत आधी निराधार लोकांना प्रति महिना 1,000 रुपये एवढे पेन्शन अर्थात अनुदान दिले जात होते. मात्र नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान पाचशे रुपयांनी वाढवले आहे.
अर्थातच आता या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति महिना 1500 रुपये एवढे मानधन मिळत आहे.यामुळे संबंधित निराधार लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान शासनाने निराधार लोकांसाठी सुरू केलेल्या याच योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तहसील मध्ये नोंद असलेल्या या योजनेच्या 7565 निराधार लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी अनुदानाची रक्कम मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पंढरपूर तहसील अंतर्गत या योजनांसाठी पात्र असलेल्या निराधार लाभार्थ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची अनुदानाची रक्कम मिळालेली नव्हती.
शासनाकडून यासाठी निधीची उपलब्धता झाली नसल्याने ही अनुदानाची रक्कम संबंधितांना प्राप्त होत नव्हती. मात्र शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची अनुदानाची रक्कम देण्यासाठी आदेश काढले आहेत.
अनुदान वितरणाबाबतचे आदेश शासनाच्या माध्यमातून निर्गमित झाले असल्याने आता या संबंधित लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वीच अनुदानाची रक्कम मिळणार आहे. प्रति लाभार्थी 4500 एवढी तीन महिन्यांची थकीत रक्कम निराधार लोकांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी वर्ग होणार आहे.
विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या अनुदानासाठी देखील शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितच शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे पंढरपूर तहसील अंतर्गत नोंदणी असलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे संबंधित निराधार लोकांची यंदाची दिवाळी गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.