Maharashtra News : मान्सून (Monsoon News) आता अंतिम टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात मान्सून (Monsoon) संपूर्ण भारत वर्षातून अलविदा घेणार आहे. राज्यात देखील येत्या काही दिवसांत मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात होणार आहे.
दरम्यान शेवटी शेवटी मान्सून (Maharashtra Rain) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात उसंत घेतलेला मानसून सप्टेंबरमध्ये जोरदार बरसत असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.
खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांना (Kharif Crops) नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे.
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. एवढेच नाही तर या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची बेकिंग नासाडी झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडली असल्याचे जाणकार नमूद करत आहे.
आता अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना माय बाप शासनाकडून मदत दिली जाणार आहे. यामुळे शासनाच्या (maharashtra government) या कौतुकास्पद निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवर महत्वपूर्ण माहिती जारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले की, राज्यातील पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर (Ahmednagar) या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. या संबंधित जिल्ह्यातील काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीत या नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन मायबाप शासनाकडून महत्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे तसेच ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिले आहेत.