Maharashtra News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात प्रवासासाठी रेल्वे एक महत्त्वाचे साधन आहे. दरम्यान राज्यातील मुंबई पुणे आणि नागपूर या तीन कॅपिटल शहरांमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
खरंतर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे ही संख्या सणासुदीच्या काळात दुपटीने वाढते. अशातच येत्या दोन दिवसात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 24 ऑक्टोबरला नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे आणि विजयादशमीचा सण साजरा होणार आहे. तसेच पुढल्या महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे.
अशा स्थितीत रेल्वे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. मध्य रेल्वेच्या विविध मार्गांवर प्रवाशांची संख्या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढते. हेच कारण आहे की मध्य रेल्वेने राजधानी मुंबई सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर या शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर दरम्यान आणि पुणे ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान द्विसाप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे आणि पुणे ते नागपूर दरम्यान साप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे. दरम्यान आज आपण या विशेष रेल्वे गाडीबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई-नागपूर सुपरफास्ट स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक
मध्य रेल्वे कडूनप्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई ते नागपूर दरम्यान द्वि साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या वीस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. CSMT – नागपूर स्पेशल ट्रेन 19 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत सोमवारी अन गुरुवारी धावनार आहे. या कालावधीत सीएसएमटी येथून ही गाडी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे. तसेच नागपूर ते सीएसएमटी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 21 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी आणि शनिवारी चालवली जाणार आहे. ही गाडी या नियोजित वेळेत १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठं थांबणार मुंबई-नागपूर स्पेशल ट्रेन
मध्य रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
पुणे-नागपूर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार?
पुणे ते नागपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या दहा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. नागपूर-पुणे सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 19 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत प्रत्येक गुरुवारी नागपूर येथून 19:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी 11:25 वाजता पुण्याला पोहोचणार आहे. तसेच 20 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान पुणे-नागपूर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीमध्ये दर शुक्रवारी पुण्यातून 16:10 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 6:30 वाजता नागपूर येथे पोहोचेल.
कुठे थांबणार पुणे-नागपूर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन
ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.