Maharashtra News : अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठा वाढला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना शासनाच्या माध्यमातून सर्व महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व पंचायतराज विभागामार्फत नागरिकांना ऑनलाइन दाखले उपलब्ध करून देण्यासाठी एका विशिष्ट एप्लीकेशन ची निर्मिती करण्यात आली आहे.
महा- ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नामक एप्लीकेशन यासाठी विकसित करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने नागरिकांना आता जन्ममृत्यू दाखला, विवाह नोंद दाखला, घराचा नमुना नंबर आठ अ उतारा यांसारखी तब्बल 33 प्रकारचे दाखले घरबसल्या ऑनलाईन काढता येणार आहेत.
म्हणजेच आता ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असलेले जवळपास सर्वच दाखले नागरिकांना या एप्लीकेशन च्या मदतीने घर बसल्या प्राप्त करता येणार आहेत. एवढेच नाही तर या ॲप्लिकेशनच्या मदतीने घरपट्टी पाणीपट्टी भरणा देखील करता येणार आहे. साहजिकच या ॲप्लिकेशनच्या मदतीने घरबसल्या नागरिकांना दाखले उपलब्ध होणार असल्याने शिवाय कर भरणा करण्याची कामे घरबसल्या होणार असल्याने त्यांच्या वेळेची बचत होईल तसेच ग्रामपंचायत मध्ये त्यांना चकरा माराव्या लागणार नाहीत.
या ठिकाणी विशेष बाब अशी की हे एप्लीकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी महा- ई-ग्राम सिटिझन कनेक्ट असं प्ले स्टोअर वरती सर्च कराव लागणार आहे. यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे. एप्लीकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर या ॲप्लिकेशन वरती रजिस्ट्रेशन नागरिकांना करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याची तालुक्याची आणि गावाची निवड करावी लागेल.
यानंतर नागरिकांना या ॲप्लिकेशनच्या मदतीने 33 प्रकारच्या दाखल्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, घरपट्टी पाणीपट्टी यांसारख्या ग्रामपंचायत मधील कर भरणा याच्या मदतीने होणार आहे. एवढेच नाही तर यां एप्लीकेशनच्या मदतीने ग्रामपंचायत सदस्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. यासोबतच नागरिकांना आपण पूर्वी भरणा केलेल्या सर्व कराची माहिती देखील त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट ॲपवरून नागरिकांना जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, असेसमेंट उतारा, नमुना नंबर आठ अ उतारा, यांसारखी 33 दाखले उपलब्ध होतील. शिवाय विवाह नोंदणी देखील करता येणार आहे. यासाठी मात्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता या अँप्लिकेशनच्या मदतीने संबंधितांना करावी लागणार आहे.