Maharashtra News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खर पाहता, महाराष्ट्रातील पशुपालक शेतकरी बांधवांना लंपी स्कीन या चर्मरोगामुळे मोठा फटका बसला होता. या रोगामुळे महाराष्ट्रातील हजारो पशुधन मृत्यूच्या विळख्यात सापडले होते.
अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे अन पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेल पशुधन या आजारामुळे दगवले यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक फटका बसला. अशा परिस्थितीत शासनाने या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात पशुपालक शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकरी बांधवांचे पशुधन या आजारामुळे मृत्यूमुखी पडले. दरम्यान आता लंपी आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात पशुपालकांना नुकसान भरपाई म्हणून कोट्यावधी रुपये मंजूर झाले आहेत. खरं पाहता संपूर्ण राज्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी तीन कोटी रुपये एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात या आजारामुळे सर्वाधिक पशुधनाची हानी झाली असल्याने जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंतच्या अहवालानुसार लम्पी स्कीन या चर्म रोगामुळे 3 हजार 276 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 910 प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना 2 कोटी 22 लाख 6 हजार रुपये अनुदानस्वरूप नुकसान भरपाई वाटप करण्यात आले आहे.
यासंबंधीच्या समितीने मंजूर केलेले, परंतु अनुदान वाटपासाठी प्रलंबित असलेले १ हजार ३७६ प्रस्ताव असून, या प्रस्तावासाठी ३ कोटी ३२ लाख १० हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे. दरम्यान ७८४ प्रस्ताव सध्या मंजुरीसाठी समितीकडे प्रलंबित आहेत.
दरम्यान प्रस्ताव मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना आता ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निश्चितच सोलापूर जिल्हा सहित संपूर्ण राज्यात लंपी आजारामुळे ज्या शेतकरी बांधवांचे पशुधन दगावले होते अशा बाधित शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.