Maharashtra News : महाराष्ट्रात नवोदित शिंदे फडणवीस सरकारमध्ये अधिकाअधिक विकासाची कामे केली जावेत यासाठी केंद्र शासनाकडून यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि भाजप यांना आगामी लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2024 मध्ये जर विजयाचा गुलाल उधळायचा लागेल तर विकासाच्या कामाला गती देणे अपरिहार्य आहे.
हेच कारण आहे की, या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्गसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पाच्या कामांना चालना लाभणार असून काही प्रलंबित कामे यामुळे निकाली निघतील अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी 13539 कोटींचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आला आहे. खरं पाहता 2009 ते 2014 दरम्यान अवघा 1 हजार 171 कोटी एवढा निधी राज्याला मिळत होता. म्हणजेच यामध्ये 11 पट वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मध्य रेल्वेला यंदा दहा हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाशी तुलना केली असता ही रक्कम 46 टक्के अधिक आहे.
मध्य रेल्वेला गेल्यावर्षी 7251 कोटी चा निधी लाभला होता. यंदा मात्र मध्ये रेल्वेला दहा हजार सहाशे कोटीचा निधी मिळाला असून आता मध्य रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. या तरतूद करण्यात आलेल्या निधीतून आता सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १०, ११, १२ आणि १३ वर २४ डब्याची गाडी उभी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याकरिता २० कोटी रुपये, पनवेल – कळबोली कोचिंग टर्मिनस फेज – १ टप्पा १ साठी १० कोटी, बडनेरा वंगण दुरुस्तीसाठी ४० कोटी, रत्नागिरी रोलिंग स्टॅक कारखान्यासाठी ८२ कोटी, रेल्वे मार्गिकेचे नूतनीकरणसाठी १४०० कोटी, पुलाचे काम बोगद्यांचे कामासाठी ११३ कोटी आणि सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशसाठी २३७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
याशिवाय अजून काही नवीन रेल्वे लाईनची कामे केली जाणार असून काही रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण देखील होणार आहे. दरम्यान, आज आपण कोणत्या रेल्वे लाईनचे दुहेरीकरण केले जाणार आहे तसेच कोणती नवीन रेल्वे लाईन विकसित केली जाणार आहे. याची माहिती जाणून घेणार आहोत मात्र यासाठी खालील लिंकवर क्लिक करून नवीन पेजवर आपल्याला जावे लागणार आहे.