Maharashtra New Vande Bharat Express List : देशात सध्या वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. काल देशाला अकरावी वंदे भारत एक्सप्रेसची भेट केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे. भोपाल ते नवी दिल्ली दरम्यान ही एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दुपारी सव्वातीन वाजता या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. म्हणजे आता देशात एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत.
यापैकी आपल्या राज्यात चार वंदे भारत एक्सप्रेस आहेत. दरम्यान, एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशभरात एकूण 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये थोडा बदल देखील करण्यात आला आहे. शासनाने आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस चे डब्बे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता 16 डब्ब्या ऐवजी 8 डब्ब्याची वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली जाणार आहे. यामुळे या वंदे भारत एक्सप्रेस चे उत्पादन करणे जलद गतीने शक्य होणार आहे. परिणामी शासनाला आपले उद्दिष्टे गाठता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस देशभरात सुरू होणार आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे. सध्या राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपूर या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
या रूटवर लवकरच धावणार वंदे भारत
काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिलेल्या माहितीनुसार 12वी वंदे भारत एक्सप्रेस जयपुर ते दिल्ली दरम्यान धावणार आहे. सध्या या रूटवर ट्रायल सुरू असून लवकरच वंदे भारत गाडी या रोडवर सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे. यासोबतच आपल्या महाराष्ट्रात देखील लवकरच आणखी काही मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहेत.
मुंबई ते गोवा आणि पुणे-सिकंदराबाद या रोडवर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन नेमक्या केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र 15 पर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे या पार्श्वभूमीवर ऑगस्ट पूर्वीच या रूटवर ही ट्रेन चालवली जाऊ शकते. असा दावा केला जात आहे.