Maharashtra New Railway Route : सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. गेल्या महिन्यात संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. नवरात्र उत्सवात संपूर्ण देशभरात मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ओसांडली होती.
यामुळे रेल्वे प्रवाशांना नवरात्र उत्सवाच्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.दरम्यान आता येत्या चार दिवसांमध्ये संपूर्ण देशात दिवाळीचा मोठा सण सुरू होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सर्वसामान्य नागरिक सण साजरा करण्यासाठी गावाकडे रवाना होऊ लागले आहेत. खरंतर कोणताही उत्सव असो शहरात स्थायिक झालेली गावाकडील जनता सण साजरा करण्यासाठी गावाकडे परतत असते.दिवाळीला देखील लाखो नागरिक सण साजरा करण्यासाठी आपल्या गावी परतणार आहेत.
पण दिवाळी सणाला नेहमीप्रमाणेच यंदाही रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची आत्तापासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांना रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याचे चित्र आहे.रेल्वे प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो.
यामुळे दिवाळीच्या काळात गावी जाण्यासाठी अनेकजण रेल्वेलाच पसंती दाखवतात. हेच कारण आहे की, रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते आणि अनेकांना रेल्वेचे तिकीट मिळत नाही. परिणामी काही लोकांना नाईलाज म्हणून खाजगी बसेसने किंवा इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा लागतो.
दरम्यान नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वेने दिवाळीच्या काळात विविध मार्गावर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे कडून दिवाळी उत्सव विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा आणि आरामदायी बनला आहे.
दिवाळीला रेल्वेमध्ये गर्दी वाढलेली असतानाही अतिरिक्त रेल्वे गाड्यांमुळे लोकांना रेल्वेने प्रवास करता येत आहे. दरम्यान मध्ये रेल्वेने आजपासून आणखी एक दिवाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी ब्रह्मपूर ते सुरत दरम्यान चालवली जाणार आहे.
या गाडीच्या ब्रह्मपूर ते सुरत आणि सुरत ते ब्रह्मपूर अशा प्रत्येकी आठ फेऱ्या चालवल्या जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या माध्यमातून समोर आली आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असेल वेळापत्रक ?
ही गाडी आज पासून चालवली जाणार आहे. आज पासून 27 डिसेंबर पर्यंत ही विशेष गाडी चालवली जाईल. या कालावधीमध्ये ही गाडी दर बुधवारी दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी सुरत येथून रवाना होईल आणि शुक्रवारी एक वाजून पंधरा मिनिटांनी ब्रह्मपूर येथील रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच या कालावधीमध्ये ही गाडी दर शुक्रवारी ब्रह्मपूर येथील रेल्वे स्थानकावरून 3 : 30 वाजता निघेल आणि सुरतला एक वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.
विशेष गाडी कुठे थांबणार
ही गाडी वर्धा, अकोला, भुसावळ, धरणगाव, विजयवाडा, नंदुरबार, जळगाव, अकोला, विजयनगर, वारंगल या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. म्हणजे या गाडीमुळे खानदेश आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीमुळे खानदेश आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांचा सणासुदीमधील प्रवास जलद आणि गतिमान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.