Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राज्यातील रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत खूपच मजबूत झाली असल्याचे चित्र आहे. राज्यात अनेक महामार्गांची कामे सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्या राज्यात विविध महामार्गांचे कामे पूर्ण केली जात आहेत.
सध्या स्थितीला काही महामार्गाची कामे सुरू आहेत तर काही महामार्गाची कामे प्रस्तावित असून या महामार्गाची कामे आगामी काळात सुरू होतील अशी आशा आहे. सध्या स्थितीला राज्यात समृद्धी महामार्ग या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
मात्र हा संपूर्ण महामार्ग केव्हा सुरू होणार हा मोठा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे आणि आज आपण याच विषयी माहिती पाहणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्प अंतर्गत राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित केला जात आहे.
या महामार्गाला हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला.
यानंतर या महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते भरविर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू झाला. यानंतर ४ मार्च 2024 ला या महामार्गाचा तिसरा टप्पा सुरू झाला.
गेल्या महिन्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी दगडू भुसे यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. भरवीर ते इगतपुरी अशा पंचवीस किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन दादा भुसे यांनी केले असून हा देखील टप्पा आता सर्वसामान्यांसाठी वाहतुकीकरिता खुला झाला आहे.
मात्र इगतपुरी ते आमने हा टप्पा केव्हा सुरू होणार आणि संपूर्ण नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांकरिता वाहतुकीसाठी केव्हा दाखल होणार? हा सवाल आहे. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा संपूर्ण महामार्ग जुलै 2024 अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
सध्या स्थितीला इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरात लवकर हा देखील टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. सद्य:स्थितीत या मार्गाचे 90 टक्के कामे पूर्ण झाले आहे.
हा मार्गही जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यातून नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गावरून करणे वाहनांना शक्य होणार आहे. यामुळे नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर हा प्रवास जलद होणार आहे.