Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे विकसित करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच सुरळीत झाली असून अजूनही राज्यात अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत.
काही महामार्गांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. समृद्धी महामार्गाचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. खरे तर समृद्धी महामार्ग हा राज्य शासनाचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा महामार्ग राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना कनेक्ट करतो.
या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर एवढी असून आत्तापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सर्वप्रथम या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता.
यानंतर या महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा 2023 मध्ये सुरू झाला. पुढे या महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा 2024 मध्ये सुरू करण्यात आला.
दरम्यान आता इगतपुरी ते आमने या ७६ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचे खात्रीलायक बातमी प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे.
खरंतर इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा विधानसभा निवडणुकीचे आचारसहिता सुरू होण्याआधीच सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा मानस राज्य रस्ते विकास महामंडळाचा होता. मात्र या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाचे कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली नाहीत आणि याच कारणाने विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता सुरू होण्याआधी हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊ शकला नाही.
नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते आमणे (भिवंडी) या शेवटच्या ७५ किलोमीटरच्या टप्प्यातील कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शहापूर शेरे-आमणे रस्त्यावरील बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
लवकरच ही कामे पूर्ण करून हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहापूर, कल्याण, आमणे मुख्य रस्त्यावरील बहुतांशी कामे आता पूर्ण करण्यात आली आहेत.
काही किरकोळ कामांवर शेवटचा हात फिरवला जात आहे. इगतपुरी, कसारा घाट परिसर, भातसा धरणाखालील उड्डाण पूल, शहापूर शेलवली-शेरे, कोळकेवाडी गावाजवळील उड्डाण पुलाचे कामे पूर्ण करण्यात आले आहे. कल्याण तालुक्यातील फळेगाव परिसरातील समृध्दी महामार्गावरील टोल नाक्याची उभारणी पूर्ण करण्यात आली आहेत.
अर्थातच राज्यात नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर लगेचच समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान चा प्रवास सुसाट होणार असून आता सर्वसामान्य प्रवाशांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे.