Maharashtra New Expressway : पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात प्रस्तावित असणाऱ्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे च्या लांबी मध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
शिरूर ते मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर यादरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या महामार्गाची लांबी आता 50 किलोमीटरने वाढवले जाणार असल्याने या निर्णयाचा मराठवाडा विभागातील नागरिकांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे.
मराठवाड्यातील अनेक अविकसित भागातील विकासाला शासनाच्या निर्णयामुळे नवीन संजीवनी मिळणार आणि या भागातील विकास जलद गतीने होणार अशी आशा बळावू लागली आहे.
खरे तर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे प्रकल्पाला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणाऱ्या या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे महामार्ग प्रकल्पासाठी 1486 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम मात्र एमएसआरडीसी ऐवजी एमएसआयडीसी च्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे.
या महामार्गाचे काम बीओटी तत्त्वावर पूर्ण होणार अशी माहिती समोर आली आहे. हा महामार्ग राज्यातील समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित होणार आहे. अर्थातच हा एक ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे महामार्ग प्रकल्प राहणार असून याची लांबी 205 किलोमीटर एवढी असेल.
या प्रकल्पामुळे पुणे ते छत्रपती संभाजी नगर दरम्यान चा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक सुपरफास्ट होईल अशी आशा आहे. मात्र या महामार्ग प्रकल्पासाठी 2633 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.
खरे तर या प्रकल्पाचे काम आधी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्याचे नियोजित होते मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे काम नव्याने स्थापित झालेल्या एमएसआयडीसी या संस्थेकडे वर्ग करण्यात आले आहे.
एमएसआयडीसी कडे या प्रकल्पाचे काम वर्ग झाल्यानंतर काल या प्रकल्पाला राज्य शासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल आणि लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे.