Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे देशभरात विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. गेल्या एका दशकाच्या काळात अनेक रस्ते महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच आगामी काळात काही नवीन महामार्ग प्रकल्पांचे कामे सुरू होणार आहेत.
अशातच महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य शासनाने आणखी एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिरूर-छत्रपती संभाजी नगर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे 205 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
या प्रकल्पासाठी 14 हजार 886 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी अडीच हजार हेक्टर होऊन अधिक जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. या 205 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे काम बीओटी तत्त्वावर केले जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर 2008 च्या पथकर कायद्यानुसार या मार्गाने प्रवास करण्यासाठी पथकर द्यावा लागणार आहे. या मार्गासाठी 2633 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.
खरंतर या महामार्ग प्रकल्पाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. पुणे छत्रपती संभाजी नगर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे ला कधी मंजुरी मिळणार याचे काम कधी सुरू होणार असे अनेक प्रश्न नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत.
अखेर कार महाराष्ट्र राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या महामार्ग प्रकल्पाला कालच मंजुरी दिली आहे.
यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा नक्कीच पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास वेगवान होणार आहे.